logo

ऐन निवडणूक काळात ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार

देशात लोकसभा निवडणूक होत आहे. सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहतंय. शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. अशातच आता ऐन निवडणूक काळात ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांचा निकटवर्तीय, विश्वासू नेता भाजपमध्ये प्रवेश आज प्रवेश करणार आहे. मात्र हा बडा नेता कोण याबाबतची स्पष्टता आलेली नाही. या नेत्याचं नाव कळू शकलेलं नाही. पण राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

बड्या नेत्याचा आज भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा बडा नेता कोण? या नेत्याचं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आज सकाळी ठाकरे गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.आज सकाळी 10. 30 वाजता भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. हा नेते नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

‘त्या’ महिला नेत्याची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट

काँग्रेसचे नेते, पंजाबचे माजी राज्यापाल, माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनीही काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या देखील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात घडत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरेंना धक्का; तर भाजपची ताकद वाढणार

लोकसभा निवडणूक होत आहे. भाजप, शिवसेना- शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरूद्ध काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात यंदा राज्यात थेट लढत होत आहे. लोकसभेची एक-एक जागा महत्वाची आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. अशात जर बडा नेता ठाकरेंना सोडून भाजपमध्ये गेला तर ठाकरेंसाठी तो धक्का असेल तर भाजपची ताकद वाढवणारा असेल.
जन जन की आवाज सोशल मीडिया
रिपोर्ट शिवाजी श्रीमंगळे .

20
726 views